दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस, ‘मोक्का’तला आरोपी सोडवला हे अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलं; जितेंद्र आव्हाडांचा निशाणा..


मुंबई : दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. कायदा नमवण्यासाठी सत्ताधा-यांची किती चालते हे दादांनी स्वत: सांगितले, अशा खोचक शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ट्विटरवरून एक व्हीडीओ आणि त्यासोबत पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बारामतीमधील एका सभेत अजित पवार यांनी केलेल्या विधआनाच दाखला देत, आव्हाडांनी दादांवर निशाणा साधला. दादांच्या शब्दातून येथील कारभार कसा उत्तमरित्या सुरू आहे.

याची गॅरंटी देण्यात आली, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. एवढंच नव्हे तर मी दादांवर टीका केली नाही, त्यांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाचे कौतुक केले, अशा शालजोडीतला टोमणाही त्यांनी लगावला आहे.

२५ हजार कोटींचा टॅक्स माफ करून घेतला
दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. २५ हजार कोटीचा इन्कमटॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधा-यांकडून हेदेखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, सालं काय दुर्दैवं आहे. आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेपण आम्ही काढू शकत नाही किंवा ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधा-यांची किती चालते, हे सगळे दादा आपल्या तोंडून सांगून गेले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!