सीरम इन्स्टिट्यूट लवकरच ‘या’ आजारांवर लस बनवणार, सायरस पुनावाला यांची मोठी घोषणा…


पुणे : सीरम इन्स्टिट्यूट आता डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार असून डेंग्यूवरची लस वर्षभरात बाजारात येणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी केली आहे.

काल पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होणार आहे.

ते म्हणाले, कोविड लशीच्या यशानंतर आम्ही डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार आहे. या लसीची नितांत गरज आहे. आफ्रिक देशात आणि भारतात डेंग्यू आणि मलेरियाची साथ कायम येते. यावर उपाय आहेत मात्र ठोस अशी लस नाही त्यामुळे आम्ही ही लस तयार करणार आहोत, असं पुनावाला यांनी म्हटले आहे.

सायरस पुनावाला यांनी डेंग्यूची लस वर्षभरात आणणार असल्याची घोषणा केली. या लसीमुळे डेंग्यूचे चारही प्रकार बरे होण्याची खात्री असेल. सीरम इन्स्टिट्यूट लवकरच लस बाजारात आणण्याच्या दिशेने पावले उचलत आहे.

काही लसींमुळे महिलांच्या गर्भाशयावर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी ही लस असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात सध्या डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र यावर कोणताही रामबाण उपाय नाही. त्यामुळे अनेकदा नागरिकांची तब्येत खालावते परिणामी मृत्यूदेखील होतो.

हीच बाब लक्षात घेत आता सीरम इन्स्टिट्यूट डेंग्यू आणि मलेरियावर लस बाजारात आणणार आहे. येत्या वर्षभरात डेंग्यूवरची लस बाजारात उपलब्ध होणार आहे तर मलेरियावरची लस बाजारात येण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!