Cyclone Michaung : चक्रीवादळाने घातले थैमान! नद्या, कालवे, तलाव फुटले, आंध्र प्रदेशमध्ये जनजीवन विस्कळीत..
Cyclone Michaung : आंध्र प्रदेश किनारपट्टीवर भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शहर आणि जवळपासच्या गावांना जोरदार तडाखा बसला आहे. यामुळे अनेक लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अनेक रस्ते खराब झाले, नद्या, कालवे, तलाव फुटले आणि हजारो एकरातील पिके पाण्याखाली गेली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत कार्यासाठी २२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. Cyclone Michaung
मंगळवारी चेन्नई आणि आसपासच्या विविध पावसाशी संबंधित घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आणि ११ लोक जखमी झाले, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणी तुंबलेल्या भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.
तसेच आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात ५२ पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे ६०,००० हून अधिक लोक राहू शकतात. चार लाख टन धान्य ओले होण्यापासून वाचवण्यासाठी राज्य सरकारकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. एलुरु जिल्ह्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. Cyclone Michaung
चक्रीवादळ ‘मिचॉन्ग’ आंध्र प्रदेशातील मध्य किनारपट्टीवरील धडकल्याने थोडं कमकुवत झालं आहे. आंध्र प्रदेशातील बापटलापासून अंदाजे १०० किमी उत्तर-वायव्य आणि खम्ममच्या ५० किमी आग्नेयेकडे चक्रीवादळाचा लँडफॉल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या काही तासात चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होईल, पुढील सहा तासांत चक्रीवादळाचा कहर कमी होईल, असा अंदाज आहे.