आज धडकणार बिपरजॉय चक्रीवादळ, मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याची शक्यता, दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले..


अहमदाबाद : सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍याकडे सरकत आहे. यामुळे यामध्ये मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते अतिशय धोकादायक रूप धारण करत आहे. यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

कच्छच्या जखाऊ येथे आज दुपारी चार ते आठच्या दरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे अनेकांना तेथून हलवले आहे.

या भागातील लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. ७४,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच कोणीही याठिकाणी येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आठ किनारी जिल्ह्यांतील एकूण ७४,३४५ लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात नेण्यात आले. एकट्या कच्छ जिल्ह्यात सुमारे ३४,३०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

यानंतर जामनगरमध्ये १०,०००, मोरबीमध्ये ९,२४३ राजकोटमध्ये ६,०८९ देवभूमी द्वारकामध्ये ५,०३५ जुनागढमध्ये ४,६०४ पोरबंदरमध्ये ३,४६९ आणि गिर सोमनाथ जिल्ह्यात १,६०५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

आता हे वादळ किती नुकसान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र आणि राज्य सरकार देखील यावर लक्ष ठेवून आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!