राज्यातील ‘या’ बँकेवर मोठी कारवाई!! ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत, रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय…


मुंबई : मुंबईतील भवानी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कडक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनुसार बँकेच्या कोणत्याही खातेदाराला ४ जुलै २०२५ पासून पुढील सहा महिने पैसे काढता येणार नाहीत.

तसेच बँकेची आर्थिक स्थिती डळमळीत असल्यामुळे, आणि खातेदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी RBI ने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ च्या कलमान्वये ही कारवाई केली आहे.

या निर्णयामुळे बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही, मात्र बँकेची स्थिती सुधारली तर या निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जाऊ शकते, असे RBI ने स्पष्ट केले आहे.भवानी सहकारी बँकेच्या दादर आणि घाटकोपर शाखांमध्ये खातेदारांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

अनेक खातेदारांना अचानक पैसे काढता न आल्याने वैद्यकीय, शैक्षणिक किंवा अत्यावश्यक खर्चांसाठी अडचणीत सापडावे लागले. बँकेचे कर्मचारी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने नाराजी अधिक वाढली आहे.

विशेषतः महिलांमध्ये मोठा रोष असून, ‘लाडकी बहीण’ योजनेतील रक्कम अडकली असल्याचे अनेकांनी सांगितले. एका महिलेने सांगितले, “माझ्या पाच हजार रुपयांची गरज होती, पण मला सांगण्यात आलं की पैसे काढता येणार नाहीत. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे पैसे आहेत.” ही स्थिती अनेक खातेदारांना आर्थिक अडचणीत टाकणारी आहे.

RBI ने स्पष्ट केलं आहे की, भवानी सहकारी बँकेच्या संचालक आणि व्यवस्थापन मंडळाला वेळोवेळी सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ते निर्देश पाळण्यात अपयशी ठरल्यामुळे खातेदारांच्या हिताच्या दृष्टीने कठोर निर्णय घ्यावा लागला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!