लग्नसराईत ग्राहकांना धक्का! सोनं- चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर…

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 1,26,081 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला. तीन दिवसांतील ही उसळी बाजारातील गुंतवणूकदारांपासून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांनाच चिंतेत टाकणारी आहे.

दरम्यान, चांदीच्या किंमतीतही मोठी उडी पाहायला मिळत असून एका किलो चांदीचा भाव 1,59,025 रुपये झाला आहे. जागतिक बाजारातही सोनं 4,164.30 डॉलर प्रति औंस तर चांदी 52.37 डॉलर प्रति औंस या दराने ट्रेड होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही भारतीय बाजारावर सरळ परिणाम दिसून येत आहे.
25 नोव्हेंबरपासून सोन्याच्या किंमतीत वाढीचा जोर कायम आहे. 25 नोव्हेंबर रोजी एका ग्रॅम 24 कॅरेट सोन्यात 191 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबरला आणखी 87 रुपयांची वाढ नोंदवली गेली. हे दर बुधवारी सकाळच्या सत्रातही वाढतच राहिले. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम दर 12,807 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम 11,741 रुपये इतका झाला आहे.
वायदे बाजारातही सोन्याचा सौदा वाढून 1,25,700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका पोहोचला. स्थानिक करांसह अतिरिक्त शुल्कांमुळे अनेक शहरांमध्ये हा दर आणखी वाढतो. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीचा जास्त फटका बसत आहे.
फक्त सोनंच नाही तर चांदीही मागील तीन दिवसांपासून डोकं वर काढताना दिसत आहे. 25 नोव्हेंबर रोजी चांदी प्रति किलो 4,000 रुपये महागली. त्यानंतर 26 नोव्हेंबरला तिच्या किमतीत आणखी 2,000 रुपयांची वाढ झाली. बाजारातील संकेतांनुसार आज सकाळी पुन्हा 4,000 रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे.
गुडरिटर्न्सच्या अहवालानुसार, आज एका किलो चांदीचा दर तब्बल 1,73,000 रुपये झाला आहे. तीन दिवसांच्या कालावधीत चांदीने घेतलेली उसळी पाहता लग्नसराईतील खर्चात वाढ होण्याची शक्यता निश्चित दिसत आहे.
ग्राहकांना सोने–चांदीचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी आता बाजारपेठेत जाण्याची गरज नाही. IBJA दररोज (शनिवार, रविवार आणि केंद्र सरकारने घोषित केलेल्या सुट्ट्यांशिवाय) देशातील अधिकृत दर जाहीर करते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे अद्ययावत दर सहज जाणून घेऊ शकतात.
दरम्यान, या सततच्या दरवाढीमुळे गुंतवणूकदारांसाठी संधी निर्माण झाली असली तरी ग्राहकांना मात्र सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी अधिक बजेट मांडावे लागत आहे. पुढील काही दिवसांतही या किमतींमध्ये आणखी चढ–उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
