क्रेशर उद्योजकांचा पुणे जिल्ह्यात बेमुदत संप सुरू ! खाण पट्यात कारवाईच्या निषेधार्थ क्रेशर मालक आक्रमक ..!!
पुणे : पुणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि बेकायदा वाहतूक रोखण्यासंदर्भात स्थापन केलेल्या नियमाबाह्य भरारी पथकाच्या ‘वसुली’मुळे खाण व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील खाण पट्ट्यात वाहतूकदार, कर्मचारी आणि व्यावसायिकांचा उद्रेक उफाळून आला आहे.
जिल्हा महसूल विभागाच्या कारभारा विरोधात जिल्ह्यात शुक्रवारपासून (दि. २१ जून)सर्वत्र बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.तीसऱ्या दिवशीही हा संप सुरू असल्याने बांधकाम क्षेत्रासहीत विकास प्रकल्पांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्हात खाण व क्रशर उद्योगअसलेल्या खाणींवर महसुल विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. तसेच भरारी पथकाद्वारे वाहतुकीवर कारवाई सुरू आहे. या कारवाई विरोधात जिल्ह्यातील क्रेशरमालक आक्रमक झाले आहे. संघटनेच्या १३ तालुक्यातील ४२२ खाणींचा समावेश आहे. त्यापैकी १२५ खाणी पर्यावरण समितीच्या मान्यतेनुसार सुरू आहेत, तर उर्वरित खानपट्टयांना कलम ५८ अंतर्गत तात्पुरत्या परवान्यानुसार सुरू आहेत.
या सर्व खाणी आणि त्यावर अवलंबून क्रशर संघटना बेमुदत संपावर गेल्याने पुणे जिल्ह्यात सुरू असणारे मेट्रो प्रकल्प, रस्ते, विस्तारीकरण, पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यातील नाले सफाई आदी कामांना खडी , क्रेसेंड आदी मालाचा पुरवठा साखळी थांबणार आहे.
खाण व क्रेशर मालकांवर मनमानी पध्दतीने कारवाई सुरू आहे. प्रशासनाचे अशा पध्दतीने कारवाईचे धोरण हे व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासारखे आहे.आमच्या विविध मागण्यांसाठी बंद सुरू केला आहे. मागण्यांबाबत निर्णय होईपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
प्रदीप कंद, उपाध्यक्ष , पुणे जिल्हा खाण व क्रेशर मालक उद्योग संघ