भुलेश्वर मंदिरात सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी, शिवलिंग व मंदिराला केदारनाथ मंदिरा सारखी फुलांची आकर्षक आरास…


यवत : दौंड व पुरंदर तालुक्यांच्या सीमेवरील वसलेल्या भुलेश्वर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात राज्य भरातुन भाविकांनी गर्दी केली. पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वर मंदिरात रात्री १२ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

पहाटे पाचच्या सुमारास शिवलिंगावर भारती शेअर मार्केटच्या संचालिका शुभांगी भारती, माजी सरपंच राजेंद्र तावरे आदी भाविकांच्या हस्ते रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली.

यावेळी शिवलिंगावर आकर्षक सजावट राजेंद्र गुरव,विजय गुरव, चिन्मय गुरव, दादा गुरव, राहुल अवचट आदी भाविक यांच्या हस्ते तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारावर आकर्षक फुलांची आरास भारती शेअर मार्केटच्या संचालिका शुभांगी भारती यांच्या वतीने करण्यात आली होती.

दुपारी १२ च्या सुमारास श्रींची मूर्ती वाजत गाजत पाण्याच्या कुंडावर नेऊन स्तान घालून हर हर महादेव गजरात पालखीमध्ये ठेवण्यात आले. गुलाबाची उधळण करत हलगीच्या तालावर, शिवनामाच्या भक्तीत तल्लीन होत खांद्यावर कावड घेत मानाच्या कावडींनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर धार घातली, कावड यात्रेत तरुणांनी मोठ्या प्रमाणात पारंपारिक खेळ खेळत सहभाग घेतला.

दर्शनासाठी दर्शन रांग केली असल्याने भाविकांनी शांततेत दर्शन घेतले, यावेळी अनेक भाविक भक्तांकडून फराळाचे व अन्नदानाचे वाटप करण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र, माळशिरस यांच्यावतीने आरोग्य कक्ष उभारला होता.

मंदिराकडे येणारी वाहने वन विभागाच्या प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आली असल्याने मंदिर परिसरात वाहतूक कोंडीतून भाविकांची सुटका झाली. यावेळी वन विभागातून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने थाटली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!