बीडच्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले!! आता बीडमध्ये होणार ऑपरेशन सिंदूर? मोठी माहिती आली समोर..

बीड : भारताने पाकिस्तानवर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदल घेत ऑपरेशन सिंदूर ही यशस्वी मोहीम पार पाडली. यामुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. आता जसे आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केले होते, तसेच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केले पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

याबाबत त्या म्हणाल्या, बीडचा परळी म्हणजे आता दहशतीचा अड्डा झालेला आहे. खरंच याला आता अतिशय गंभीर ते ना घ्यायला हवं. कारण कालची जी मारहाण झाली. त्याच्यात सगळे मुले अतिशय छोटी होती. 18 वर्षाच्या आसपासचे होते. जसा आपण ऑपरेशन सिंदूर सीमेवर केला होता तसाच महाराष्ट्राच्या बीडमध्ये केला पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
त्यांच्या या मागणीने एकच खळबळ उडाली आहे. तर काहींनी त्यांची ही मागणी रास्त असल्याचे समाज माध्यमांवर भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे आता पोलीस प्रशासन येथील गुंडांवर नेमकं काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला.

पोलिसांनीच राजकीय नेत्यांच्या दहशतीने प्रकरणात तपास केला नसल्याचे उघड झाले. मात्र जनतेने आंदोलन केल्याने बडे चेहरे सध्या तुरूंगात आहे. पण अजूनही मनी पॉवरपुढे सर्वसामान्यांचे काहीच चालत नसल्याचे बीडमधील अनेक प्रकरणावरून समोर आले आहे. रोज काही ना काही कारनामे याठिकाणी समोर येत आहेत.
बीडमध्ये एकामागून एक दादा भाईंच्या दहशतीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. पण तरीही थातूरमातूर कारवाई पलीकडे ठोस असे काही घडत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे रोज अशाच घटना समोर येत आहेत. सध्या तर बीड हा गुंडगिरीचा जिल्हा म्हणून राज्यात परिचित झाला आहे. दहशतीने येथील सर्वसामान्यांचे जगणे असह्य केले आहे.
राजकीय नेत्यांचे जवळचे असलेले अनेक अण्णा येथे आहेत. आका येथे आहेत. कुणाचाही जीव घेण्यात त्यांना काहीच वाटत नाही. गुन्हेगारीचा आलेख अजूनही कमी झाला नसल्याचे चित्र काल काही तरुणांनी एका तरुणाला केलेल्या अमानुष मारहाणीवरून समोर आले आहे. बीडमधील परिस्थिती भयानक आहे, खरच सरकारने याठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे.