Crime News : धक्कादायक! सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार होत असताना, बघे काढत होते व्हिडिओ, घटनेने व्यक्त होतोय संताप..
Crime News : एका तरुणाने सहा वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला. आरडाओरडा ऐकून घटनास्थळी पोहोचलेले लोक त्या निष्पाप मुलीचा व्हिडिओ बनवत राहिले. Crime News
या धक्कादायक घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विनोद बाबा (वय.३५) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रेती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी सहा वर्षांची मुलगी अंगणवाडी शाळेत शिकते. शुक्रवारी (ता.२९) दुपारी तीन वाजता शाळा सुटल्यानंतर ही मुलगी गावातीलच बाजाराच्या फलाटावर खेळत होती. तिला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी जवळच्या रुग्णालयाच्या आवारात गेली.
यावेळी याच गावातील रहिवासी असलेला वर्षीय विनोद बाबा तिचा पाठलाग करत होता . त्याने मुलीला उचलून रुग्णालयाजवळील हेल्थ अँड वेलनेस सेंटरमधील खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
मुलीने ओरडा केला तेव्हा कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या खोलीत उपस्थित असलेले लोक घटनास्थळी पोहोचले. आरोपीला पकडण्याऐवजी लोकांनी मुलीचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली तसेच बघ्याची भूमिका घेऊन घेतली. नंतर काही लोकांनी मुलीच्या कुटुंबीयांना माहिती कळवली.
दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मुलीला जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.