Crime News : हॉटेलमध्ये महिलेचा मृत्यू, ५ दिवस नातेवाईक मृतदेहाजवळ बसून, भयंकर माहिती आली समोर…


Crime News : एका ४८ वर्षीय महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पोलीसांना सापडला आहे. या महिलेच्या मृत्यूला पाच दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, तिचे कुटुंबीय मृतदेहाजवळ बसून होते. महिलेचा मुलगा यूकेहून परतल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. नक्की काय घटना घडली?. ते आपण जाणून घेऊयात..

एका ४८ वर्षीय महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पाच दिवसांपेक्षा जास्त काळ होता. तिच्या कुटुंबातील चार सदस्य देखील याच खोलीत मृतदेहासोबत होते. या मृत्यू प्रकरणाचा तपास साकीनाका पोलीस करत आहेत. युकेमध्ये काम करणाऱ्या महिलेचा मुलगा शनिवारी परतला. त्याने पोलिसांना कळवलं, तेव्हा हे मृत्यू प्रकरण उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मृत महिलेचं नाव नसीमा हलाई आहे. तिचे वडील अब्दुल करीम हलाई (वय. ८२), तिची २६ वर्षीय मुलगी, तिचा भाऊ आणि पुतण्या हे सगळेजण हॉटेलच्या रूममध्ये होते.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नसीमा आजारी होती. आजारपणाने तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिच्या पुतण्यानं यूकेमध्ये असलेल्या नसीमाच्या मुलाला ईमेल पाठवला होता. Crime News

या महिलेचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांनी दिली आहे. आमच्या टीमने हॉटेलच्या खोलीत जाऊन मृतदेह बाहेर काढला, तो जवळजवळ कुजलेला होता. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

नसीमा पतीसोबत भांडण झाल्यानंतर मुलीसह घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर नसीमा, तिचे वडील, मुलगी, भाऊ आणि पुतण्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले होते. उदरनिर्वाहासाठी नसीमा शिकवणी घ्यायची. नसीमाची मुलगीही अशक्त झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितले.

जेव्हा आम्ही हॉटेलच्या खोलीत पोहोचलो, तेव्हा दुर्गंधी येत होती. आम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. यात काहीही संशयास्पद आढळलं नाही, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. खोलीत कोणत्याही हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना परवानगी नव्हती. पोलिसांनी सांगितलं की, मृत महिलेचे कुटुंब यूकेमधून तिचा मुलगा येण्याची वाट पाहत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!