Crime News : गांजा बाळगणारी महिला अटकेनंतर पोलीस ठाण्यातून पळाली, महिलेने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी….

Crime News : लोणीकंद पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मोठी पळापळ झाली. याठिकाणी गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेला दाखल गुन्ह्यात अटक केल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असताना नजर चुकवून तिने पोलीस लोणीकंद पोलीस ठाण्यातून पळ काढला.
याबाबत पोलीस आता तिचा तपास करत आहेत. वाघोली येथील गायरान वस्ती येथे होत असलेल्या गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलीसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त केला होता. यावेळी महिलेला ताब्यात घेतले होते.
गांजा बाळगणारी महिला छकुली राहुल सुकळे हिच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांकडून तिला नोटीस देण्यात आली. नंतर महिलेस अटक करून अटकेबाबत नोंद घेण्यात आली. दरम्यान, पोलीस कर्मचारी सीसीटीएनएस कक्षामध्ये काम करीत असताना छकुली सुकळे ही नजर चुकवून पळून गेली. Crime News
दरम्यान, यावेळी तिने येथून पळ काढला, नंतर ती पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व परिसरात शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. यामुळे पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
यानंतर पळून गेल्या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढत आहेत. अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून त्याला गैरमार्गाने खरेदी केले जात आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.