Crime News : मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गेली अन् काही वेळात चिमुकलीची बॉडी सापडली, थरकाप उडवणारी माहिती आली समोर…


Crime News पालघर :  मोखाडा येथे एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह ताब्यात घेतला.

नेमकं घडलं काय?

पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील आठ वर्षाची अल्पवयीन मुलीच्या मैत्रिणीचा रविवारी (ता.२७) वाढदिवस होता. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही आठ वर्षांची चिमुकली गेली होती.

त्यानंतर ती घरी परतली. मग काही वेळाने मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिच्या घरी जेवायला जायचं सांगून ही मुलगी घरातून पुन्हा निघाली होती. मात्र, ती मैत्रिणीच्या घरी पोहोचलीच नाही. Crime News

जेव्हा मुलगी घरी परतली नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी मौत्रिणीकडे जाऊन पाहिलं. तेव्हा त्यांना कळालं की ती तर मैत्रिणीच्या घरी पोहोचलीच नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र तिची शोधाशोध सुरु केली. मात्र, खूप शोधूनही ती सापडली नाही.

दरम्यान, त्यानंतर मोखाडा शहरालगत असलेल्या दफनभूमीजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास या बेपत्ता असलेल्या आठ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली.

मुलीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आळी. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मोखाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आमि मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील रुग्णालयात पाठवला आहे.

दरम्यान, मुलीचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आळी. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मोखाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आमि मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील रुग्णालयात पाठवला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!