Crime News : रामदेव बाबांच्या पतंजली कोल्ड स्टोरेजच्या मालकाने लावला ६ कोटींचा चुना, वाई एमआयडीसीतील घटना…


Crime News : वाईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील एमआयडीसीतील कोल्ड स्टोअरेज कंपनीने चक्क रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीची फसवणूक केली आहे.

कंपनीने ठेवलेले बटर परस्पर विकल्याप्रकरणी व सहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, कोल्ड स्टोअरेज मध्ये ठेवलेला माल आपण भाडेपट्ट्यावर ठेवतो. असे असताना मात्र तो माल देखील स्टोअरेजचेच मालक परस्पर विकून टाकत असतील तर काय करायचे? असं याठिकाणी घडलं आहे.

याबाबत पतंजली कंपनीने त्यांचा सहा कोटी रुपये अंदाजे किमतीचा बटर वाई एमआयडीसीतील पी.डी. शहा कंपनीच्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला होता. मात्र पी. डी. शाह सन्स कोल्ड स्टोअरेज प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक शहा व मॅनेजर यांनी संगनमत केले.

तसेच येथील त्यांच्या कोल्ड स्टोअरेज मधील पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या मालकीचे साठवणूक करून ठेवलेले ६ कोटी रुपये किंमतीचे १३४.५ टन बटर विकले. याबाबत वाईचे पोलीस तपास करत आहेत. Crime News

हा प्रकार केल्याप्रकरणी पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या वतीने ज्ञानेश्वर रामनाथ आढाव, (वय ४६, रा. खडके, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांनी वाई पोलिसात तक्रार दाखल केली. कोल्ड स्टोअरेजचा मालक व व्यवस्थापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कधी घडली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!