Crime News : भयंकर! बापानेच घेतला आपल्या दोन चिमुकल्यांचा जीव, धक्कादायक घटनेने सगळेच हादरले…
Crime News : वडिलांनीच आपल्या दोन चुमुकल्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उत्तर-पश्चिम दिल्लीतील केशव पुरम भागात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वडिलांच्या किराणा दुकानात १३ वर्षांची मुलगी आणि तिचा लहान भाऊ मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, दोन भावंडांची हत्या केल्याचा संशय असलेले मुलांचे वडील मनीष हा फरार असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, संध्याकाळी ७.१५ वाजता घटनेबाबत फोन आला. मनीषच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, दोन्ही मुले शाळेत गेली होती, मात्र घरी परतली नाही. सुरुवातीला मुलाच्या आईलावाटले की ते त्यांच्या वडिलांसोबत आहे कारण ते अनेकदा शाळेतून घेऊन येत असत. Crime News
एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी मनीषशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मोबाईल फोन उपलब्ध नव्हता. तसेच संध्याकाळी कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उघडले असता त्यांना दोन्ही भावंडे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. तपासादरम्यान असे समोर आले की मनीष काही आर्थिक समस्येमुळे त्रस्त होता, मात्र पुढील तपास सुरू आहे.
कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही स्कॅन केले जात असून मनीषचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.