Crime News : मुख्याध्यापक की हैवान! ६ वर्षात तब्बल १४२ मुलींवर लैंगिक अत्याचार, भयानक प्रकार आला समोर..


Crime News : देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तब्बल १४२ अल्पवयीन मुलींनी मुख्याध्यापकांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या हा मुख्याध्यापक अटकेत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्याच्या भागात ही शाळा असून या शाळेतील मुलींनी चक्क राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महिला आयोगाला पत्र पाठवून आपल्यावरील अन्याय दूर करण्याची विनंती केली होती. Crime News

दरम्यान, या काळात प्रांताधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने संबंधित शाळेतील तब्बल ३९० अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवले, तेव्हा त्यापैकी १४२ मुलींनी गेल्या सहा वर्षात संबंधित मुख्याध्यापकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा नोंदवला, तर इतर मुलींनी या घटनेचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत या भयानक घडलेल्या घटनांची माहिती दिली.

त्याची तातडीने दखल घेण्यात आली. यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि ३० ऑक्टोबर रोजी या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला. ४ नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. सध्या हा मुख्याध्यापक अटकेत आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!