Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी शिक्षकाला ३ वर्षे कारावास, दुसरा आरोपी पुराव्याअभावी सुटला…


Crime News : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शिक्षकास दोषी धरत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.

कोहिनूर सय्यदनूर सय्यद असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून रवींद्र वाघमारे असे निर्दोष झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, संबंधित शिक्षक शाळेतील एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करीत होता. तिने एके दिवशी वडिलांस हा प्रकार सांगताच त्यांनी शाळेत जाऊन वाघमारे यांना याची माहिती दिली. त्यावर कोणतीच कारवाई न करता शिक्षकाची बाजू घेऊन दुसरा आरोपी बोलत राहिला.

तसेच त्यानंतर ही बाब गावातील पालकांना समजताच त्यांनी आरोपीस जाऊन जाब विचारताच वाघमारे यांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी त्यास साथ दिल्याचा आरोप होता. Crime News

त्यानंतर पीडितेच्या पित्याने वैराग पोलिसांत फिर्याद दिली आणि बाललैंगिक अत्याचार व इतर गुन्ह्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याचा तपास पोलिस निरीक्षक किरण आवचर व सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. खांडेकर यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

दरम्यान, याप्रकरणात मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच नऊ साक्षीदारांच्या तपासणीत गोळा केलेले पुरावे सरकारी वकील राजश्री कदम यांनी न्यायालसमोर सादर केले.

बार्शी येथील विशेष जिल्हा न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी सय्यद यास पोक्सो अंतर्गत तीन वर्षे सक्त मजुरी व तीन हजारांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास आणखी चार महिने शिक्षा सुनावली. कोर्टपैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार कुणाल पाटील व सहायक फौजदार शशिकांत आळणे यांनी काम पाहिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!