Crime News : पुण्यातील कात्रजमध्ये भयंकर घटना! बहिणीचा मित्र थेट घरात घुसला, जबरदस्ती तोंड दाबले अन्….

Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी विश्वास पारडे (वय. २९, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास घडला. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र असल्याने त्यांच्यात ओळख होती. त्यामुळे तो फिर्यादीच्या घरी ये-जा करीत असे. फिर्यादी घरात झोपल्या असताना त्याने फिर्यादीचे तोंड दाबून जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
त्याच्या मित्राला फिर्यादी यांनी हा प्रकार सांगितला. त्याचा राग मनात धरून विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.