Crime News : उरुळी कांचन येथे शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेडया…
Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शाळेतून घरी निघालेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तरूणाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. २५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय ते सिध्दीविनायक हॉस्पिटल या परिसरात घडली आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रीतम उर्फ सोन्या बाळासाहेब ढावरे (व. १८ रा. बोरकर चाळ, उरुळी कांचन ता. हवेली) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, शुक्रवारी (ता. २५ ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रीण उरुळी कांचन गावच्या हद्दीत महात्मा गांधी विद्यालय शाळेचे गेट ते सिद्धिविनायक हॉस्पिटल येथून घरी जाण्यासाठी निघाले होते.
यावेळी प्रीतम उर्फ सोन्या डावरे याने मोटरसायकलवरून अल्पवयीन मुलींचा पाठलाग सुरु केला. यावेळी मुलीने तू आमचा पाठलाग करू नकोस असे सांगितले. मात्र त्याने पाठलाग केला व अल्पवयीन मुलीकडे पाहून मनास लज्जा उत्पन्न होईल असे विचित्र वर्तन केले. व काही न बोलता त्या ठिकाणावरून तिथून निघून गेला
दरम्यान, मोटार सायकल वरून आलेल्या आरोपीची माहिती घरी आल्यानंतर मुलीने वडिलांना दिली. त्यानुसार वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रीतम उर्फ सोन्या बाळासाहेब ढावरे याच्यावर विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.