Crime News : संतापजनक! पुणे जिल्ह्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती? दौंड तालुक्यातील शाळेतील शिक्षकाकडूनच अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार…


Crime News : बदलापूर येथे शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी मोठं आंदोलन उभं करत थेट रेल्वेरोको केला होता. ही घटना ताजी असताना आता पुणे जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे.

दौंड तालुक्यातील मळदमधील एका विद्यालयातील एका शिक्षकाकडून ७ वी, ८ वी, ९ वी मधील शिकत असणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून विद्यालयात येऊन गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे.

शाळेतील इंग्रजी विषयाच्या बापूराव धुमाळ या शिक्षकाने व्हाँट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करून अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. Crime News

याप्रकरणी पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे चौकशी करीत असुन शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात येत आहे. संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून विद्यालयात चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!