Crime news Pune : शेजारच्याने कपडे धुण्याचा बहाणा करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार ! लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल …!
(Crime News) पुणे : पुणे शहरात मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची वाढ काही थांबत नाही दिवसेंदिवस मुलीवर अत्याचार होत आहे. लोकांची हवस पूर्ण करण्यासाठी लोक दुसऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करत नाही. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार प्रामुख्याने जवळचे नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडून होत असल्याचे समोर आले आहे.अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सुदर्शन शेरमाळे (मुळ रा. मनमाड जि. नाशिक सध्या रा. हांडेवाडी ता. हवेली) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 376, 376/2/फ/न सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा नाशिक जिल्ह्यातील असून हाडंवाडी येथे रुम भाड्याने घेऊन राहतो. आरोपीने पीडित मुलीला कपडे धुण्याच्या कामानिमित्त रुमवर बोलावून घेतले. यानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तीन वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.