Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय! ३ महिलांची सुटका, महिलाच चालवत असलेला धक्कादायक प्रकार उघड…

Crime News : सध्या नागपुरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे अनेक धक्कादायक प्रकार सतत उघडकीस येत आहेत.
यामुळे याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या कायदा कितीही कडक झाला असला तरीही वेश्याव्यवसाय होतच आहे. नागपूरमध्ये जरीपटका भागात सुरू मॉलमध्ये रिलॅस्क स्पा हेअर अँड ब्युटी लॉजमध्ये परराज्यातील महिलांकडून वेश्याव्यवसाय केला जात होता.
अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असला तरी याबाबत माहिती कोणालाच नव्हती. याची पोलीस विभागाच्या सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुटका केली आहे. तसेच याबाबत तपास सुरू केला आहे. Crime News
दरम्यान, या भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रक्षा शुक्ला या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये अजून काही महिलांचा समावेश आहे.
पोलिसांकडून दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हे तिन्ही आरोपी आपल्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवत होते. यामुळे महिला देखील या गोष्टी करण्यासाठी आकर्षित होत होत्या. पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत.