Crime News : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी टाकला दबाव, प्रायव्हेट फोटो अन् व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पुण्यात नेमकं घडलं काय?


Crime News : गुन्हेगारीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या केसमधील आरोपी पुरुषाबरोबर असलेल्या महिलेचे नाव वगळण्यासाठी प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी पिडितेला देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी एका २९ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पिंपरीमधील नेहरुनगरमध्ये राहणार्‍या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी या सांगली येथे काम करतात. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२३ रोजी फईम ऊर्फ फहिमुद्दीन नईम सय्यद व एका महिलेविरोधात बलात्काराची फिर्याद दिली होती. या महिलेला फईम याने पुण्यात बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता.

या गुन्ह्याचे दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे. या गुन्ह्यात फिर्यादी व फईम याचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो असल्याचा उल्लेख आहे. फईम याने फिर्यादी यांना फसवणूक करुन ते काढलेले आहेत. २९ जुलै २०२४ रोजी फिर्यादी यांच्या दाजीच्या मोबाईलवर व्हॉटसअ‍ॅपवर फिर्यादी व फईम यांचे प्रायव्हेट व्हिडिओ वन टाईम व्ह्यु करुन पहाता येतील असे पाठविले.

फईम याची पत्नी ही मागील दोन महिन्यांपासून फिर्यादीच्या दाजींना फोन करुन धमक्या देत आहे. फिर्यादी यांनी दाखल केलेली केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. या गुन्ह्यातील फईमच्या पत्नीची आई आरोपी आहे. तिचे नाव मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे. Crime News

जर केस मागे घेतली नाही तर फईम आणि फिर्यादी यांचे प्रायव्हेट व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आहे. त्यासाठी तिने गावाकडील मस्जिद मदिना यांचे विश्वस्त लोकांना भेटून त्यांच्या केसमधून आपल्या आईचे नाव काढून टाकायला सांगावे, असे सांगितले.

त्या विश्वस्तांनी ही बाब फिर्यादीच्या आईवडिलांच्या कानावर टाकली. गावात त्यांनी फिर्यादीची बदनामी करुन मानसिक व सामाजिक हानी केल्याने फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेऊन अधिक तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!