Crime News : पोलीस दलात खळबळ! पोलीस कर्मचाऱ्यानेच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, ‘असा’ उघडकीस आला मैत्रीचा प्लॅन…
Crime News : अकोला पोलीस दलात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई शिवम दुबे याच्यावर अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मित्राच्या पत्नीसोबत फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिवम दुबे फरार झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी दुबे हा कार्यरत होता. याच दरम्यान त्याची सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्याशी चांगली मैत्री झाली. यातून दुबे याचे त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येण-जाणं सुरू झाले.
याच दरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली. त्याने आपल्या मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तीने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. यानंतर त्या दोघांचे मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. यातच दुबे याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. Crime News
कालांतराने शिवम याने मित्राच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर लगेच आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शिवम दुबे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे करीत आहेत.