Crime News : धक्कादायक! पोलिसांनी केला ऊसतोड महिला मजुरावर बलात्कार, उडाली खळबळ..


Crime News : एका पारधी समाजाच्या ऊसतोड महिला मजुरावर २ पोलिसांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहेत. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. पीडित महिला ऊसतोड मजूर तिच्या मुलांना भेटण्यासाठी बार्शी येथे जात होती.

त्यावेळी बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना चोर असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपींच्या मोबाईलवर पैसे दिले. Crime News

हे प्रकरण इथपर्यंतच थांबले नाही. आरोपींनी पीडित महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि तिला धमकीही दिली. उस्मानाबादमधील भूममध्ये ही घटना घडली असून १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे.

यावरून आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!