Crime News : शिक्रापूर वेश्याव्यवसाय प्रकरणी मोठी कारवाई! पोलिसांनी छापा टाकत ५ जणांना घेतले ताब्यात…

Crime News : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका खासगी बिल्डींगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तीन इसमांसह दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन महिलांसह वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूज (रा. पारनेर जि. अहमदनगर), बाळासाहेब फक्कडराव पोतले (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर) व संकेत सुभाष शितोळे (रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तानाजी साळुंखे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं घडलं काय?
पाबळ चौकातील स्टेटबँक ऑफ इंडिया समोर बाळासाहेब पोतले यांच्या बिल्डींगमध्ये काही इसम व महिला वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Crime News
त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस हवालदार विकास पाटील, उद्धव भालेराव, महिला पोलीस शिपाई उर्मिला पवार, शीतल गवळी यांनी सदर ठिकाणी जाऊन बनावट ग्राहक बिल्डींगमध्ये पाठवून तपासणी करत छापा टाकला.
यावेळी एक इसम इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारून पळून गेला. मात्र पोलिसांनी दोघा इसमांसह दोन महिलांना जाग्यावर ताब्यात घेत काही साहित्य व रोख रक्कम ताब्यात घेतली.