Crime News : कुत्र्याने कोंबडी खाल्ली म्हणून तिघांना केले ठार, भयंकर घटनेने उडाली राज्यात खळबळ..
Crime News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात एका व्यक्तीने तिघाजणांना चिरडले आहे. ही धक्कादायक घटना अमरावतीमध्ये नाचोना गावात घडली आहे. Crime News
चंदन राधेश्याम गुजर (वय. ३२) व राधेश्याम गोविंद गुजर (वय. ) अशी आरोपींची नावे आहेत. चंदनने चारचाकी वाहनाने घरापुढे राहणाऱ्या अंभोरे कुटुंबातील अनुसया श्यामराव अंभोरे (वय. ६५), श्यामराव लालूजी अंभोरे (वय. ७०) व चंदनची काकू अनारकली मोहन गुजर (वय. ४३) यांना चिरडून ठार केले. अपघातात शारदा उमेश अंभोरे (वय. ३६), उमेश अंभोरे (४२) आणि किशोर श्यामराव अंभोरे (वय. ३८, सर्व रा. नाचोना) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार. मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान आपल्या अंगणात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबाला एका व्यक्तीने कारने चिरडले आहे. शेजारच्या घरातील कोंबडी कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून कृत्य केल्याचे समोर आले आहे.
यात तीन जण जागीच ठार झाले असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. मृत व्यक्तींना तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.
आरोपी आणि पीडित शेजारी राहतात. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घटनेचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाचोना गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.