Crime News : आईच्या प्रियकराचे धक्कादायक कृत्य, १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून फोटो काढले अन्….


Crime News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

घटस्फोटानंतर गेल्या दहा वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच १४ वर्षीय मुलीवर दुधामध्ये औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. Crime News

नराधामाने एवढ्यावरच न थांबता मुलीचे विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ काढत मुलीला धमक्या दिल्या. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये आईच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौदा वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी दोन वर्षाची असताना तिच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर अशपाक गफ्फर शेख या व्यक्तीसोबत आंतरजातीय आईने दुसरा विवाह केला. ते दोघेही एकत्र राहू लागले.

मात्र काही दिवसानंतर अशपाक याने पीडितेच्या आईचा छळ सुरू केला. त्यांच्यामध्ये दररोज वाद होत गेले. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीची आई बेपत्ता झाली. काही दिवसांनी सर्व कुटुंब पुंडलिक नगर भागामध्ये राहू लागले. यावेळी आरोपीने पीडित मुलगी ही मोठी झाल्यानंतर तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाला मुलीने विरोध केला. त्यानंतर अशपाकने मुलीला सांगितलेल्या स्थळी लग्न कर अन्यथा माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, असे म्हणत बळजबरीने शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर मुलीला वेगवेगळ्या पदार्थांमधून औषध देऊन मुलीला बेशुद्ध करून अत्याचार करू लागला.

दरम्यान या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने अचानक घर सोडून मैत्रिणीचे घर गाठले. दरम्यान मैत्रिणीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांच्या मदतीने तिचा जबाब नोंदवून या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!