Crime News : पंडित बाबाचे धक्कादायक कृत्य! कपडे बदलताना महिलेचे मोबाईलवर शुटिंग, लोणीकंद पोलिसांकडून अटक..


Crime News  : दोष दूर करण्यासाठी पूजा करायला गेलेल्या महिलेचा आंघोळी नंतरचे कपडे बदलतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथील पंडितच हे कृत्य करत असल्याचे आढळून आले आहे.

ही घटना मंगळवारी (ता २७) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे घडली. याप्रकणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पंडिताला बेड्या ठोकल्या आहेत.

लोणीकंद पोलिसांनी अमोल विजय टोणगावकर (वय ३६, रा. बकोरी फाटा, वाघोली) अटक केली आहे.याप्रकणी एका २९ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की फिर्यादी, त्यांचे पती, दीर हे अमोल पंडित यांच्या सांगण्यावरुन तुळापूर येथील त्रिवेणी संगम येथे गेले. फिर्यादी व त्यांच्या पतीला पुजा झाल्यानंतर नदीत आंघोळ करुन आल्यानंतर फिर्यादीस पुजेच्या रुममध्ये कपडे बदलण्यास सांगितले. Crime News

फिर्यादी त्या रुममध्ये कपडे काढत असताना भिंतीच्या कोपर्‍यात असलेल्या पंडितजीच्या बॅगेशेजारी उभा ठेवलेला एक मोबाईल फोन दिसला. त्यावेळी फिर्यादी यांनी तो मोबाईल हातात घेऊन पाहिला असता तो मोबाईल फोन पंडितजीचा असल्याचे फिर्यादीस समजले.

त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉडिंग चालू होते. फिर्यादी यांची खात्री झाली की, पंडितजी याने त्यांचे नग्न अवस्थेतील चित्रीकरण करण्यासाठी त्याच्या मोबाईलचे व्हिडिओ रेकॉडिंग चालू ठेवून भिंतीलगत मोबाईल उभा ठेवून त्यात रेकॉडिंग करुन विनयभंग केला. पोलिसांनी अमोल पंडित ऊर्फ टोणगावकर याला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!