Crime News : शिकवणीच्या नावाखाली भलताच प्रकार, शिक्षकाचे २० मुलींबरोबर अश्लील चाळे, घटनेने राज्य हादरलं…


Crime News नाशिक : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे.

एका एकलव्य निवासी शाळेतील सातव्या इयत्तेतमधील १५ ते २० विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतली आहे. या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर अन्य २ शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नाशिकमधील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याच्याकडून अनेकदा असे प्रकार घडले. सुरुवातीला या मुलींनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही. मात्र काही मुलींनी धाडस दाखवत पालकांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी केली आहे. Crime News

मुलींचा जबाब नोंदवण्यात आला पीडित मुलींनी नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अहवाल विशाखा समितीने प्रकल्प कार्यालयाला सादर केला होता.

याबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आदिवासी आयुक्तालयास जाब विचारला. आदिवासी विकास आयुक्त मुंबईत असून उपायुक्त विनीता सोनावणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षक आणि २ महिला शिक्षकांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!