Crime News : दारू ठरले कारण! नवऱ्याने केली बायको आणि दोन लहान मुलांची हत्या, उडाली खळबळ.
Crime News : ठाणे जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत आपल्या दोन मूलांना बॅटने मारून त्यांना संपवले त्यानंतर बायकोची देखील त्याने हत्या केली. या घटनेने सुपर्ण ठाणे जिल्हा हादरला आहे.
अमित धर्मवीर बागडी (वय.२९) अशे आरोपीचे नाव आहे. तो फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अमित हा मूळचा हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्याच्या परिसरात राहतो. कामानिमित्ताने गेल्या काही वर्षा पासून बागडी कुटुंब या ठिकाणी ठाण्यामध्ये राहण्यास आले. Crime News
अमित हा कामावर जात नव्हता त्यामुळे त्याची पत्नी भावनांशी सतत वाद व्हायचा. काही दिवसांनी वाद टोकाला गेल्याने भावनाही दोन मुलांना घेऊन दीर विकास बागडी यांच्या घरी गेली तेथे काही दिवस ती राहिली.
विकास धर्मवीर बागडी याच्या घरी जाऊन अमितने पत्नी आणि मुलांची भेट घेतली तेव्हा वाद मिटल्याचे नाटक करत अमित हा तिथेच थांबला. यांचा वाद मिटला असल्याचे वाटल्याने विकासाने अमित याची समजूत घातली.
मात्र दुसऱ्या दिवशी विकास हा कामावर गेल्यांनतर कामावरून आला तेव्हा त्याला जे दिसले, त्याच्यामुळे त्याला धक्का बसला. कारण रक्ताच्या चारोळ्यात त्याची भावजय आणि दोन्ही पुतणे पडलेले होते.
बेरोजगारीच्या वादाचा परिणाम म्हणजे रंगाच्या भरात अमित याने आठ वर्षाची मुलगी व सहा वर्षाच्या मुलांच्या मारून टाकले. दरम्यान, आरोपी अमित हा सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.