Crime News : अघोरी उपायास नकार दिल्याने सुनेचा छळ, पारनेरमध्ये जादूटोण्याच्या प्रकरणाने उडाली खळबळ..

Crime News : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकण्यास, तसेच तिने दिलेले सरबत पिण्यास नकार देणाऱ्या सुनेला मारहाण करीत मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पती, सासू, नणंदेसह देवऋषी महिलेच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime News
सासू सुवर्णा औटी, पती साईनाथ औटी, नणंद भाग्यश्री औटी व देवऋषी उषा कळमकर (घारगाव, कळमकरवाडी, श्रीगोंदे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभांगी साईनाथ औटी असे पीडित सुनेचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सासू सुवर्णाचा दम्याचा आजार बरा व्हावा, नणंदेचे लग्न जमावे, घरासाठी भाडेकरू मिळावा, यासाठी सासरचे लोक जादूटोणा करणाऱया उषा कळमकर या महिलेकडून गेल्या सात महिन्यांपासून अघोरी उपाय करून घेत होते.
या महिलेने सांगितल्याप्रमाणे उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास, तसेच तुळजापूरच्या देवीचे वारे घेण्यास शुभांगी यांनी नकार दिला. त्यामुळे सासरचे लोक तिला शिवीगाळ आणि मारहाण करीत होते.
तरीही अघोरी कृत्य करण्यास नकार दिल्यामुळे तिला घराबाहेर काढले. त्यामुळे शुभांगी यांनी पती, सासू, नणंदेसह देवऋषी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील पारनेर पोलीस करीत आहेत.