Crime News : चाकूचा धाक दाखवत आईपुढेच मुलीवर सामूहिक बलात्कार, घटनेने उडाली खळबळ..


Crime News : मुंबई : काही दिवसांत मुंबईत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईसमोरच तिच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. ही घटना मुंबईच्या मुलुंड भागात घटना घडली आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सामूहिक बलात्कार झालेली पीडित तरुणी अवघ्या १५ वर्षांची आहे. आरोपींनी आईला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

याप्रकरणी पोलिसांनी एका २१ वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी सामूहिक बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका १४ वर्षीय गतीमंद मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती. काही दिवसांतच १५ वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यामुळे मुंबईत मोठी खळबळ माजली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!