Crime News : बाजूला व्हा म्हणल्याचा आला राग, चौघांच्या अंगावर कार घातली अन्…,पुण्यात धक्कादायक घटना
Crime News : वाहतूक कोंडी होते आहे. तुम्ही बाजूला व्हा, असे म्हणल्याने चिडून जावून चौघांच्या अंगावर कार घालून त्यांना जिवे मारण्याचा पर्यंत केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना तुळापूर -आंळदी रोडवरील अर्मासेल कंपनी समोरील रोडवर मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडली आहे. यामध्ये चौघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Crime News
याप्रकरणी संकेत चिंधु पडवळ (वय. २४ वर्ष, रा. कुरकुंडी ता. राजगुरुनगर) याने फिर्याद दिली. तर गौरव दिपक लगड (वय. २२ वर्ष, रा. तुळापुर), अविनाश बनकड शेळके (रा. आळंदी), सुरेखा अनंत सावने (रा. तुळापुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संकेत, जगदीश शिवेकर, अश्विनी पवसे, सोनाम अंधारे हे चौघे जण गंभीर जखमी झाले.
सविस्तर माहिती अशी की, रोडवर ट्रॉफिक जाम झाले होते. तेव्हा जगदीश शिवेकर हा आरोपींना रोडवर ट्रॉफिक जाम होत आहे, तुम्ही रोडचे बाजूला व्हा, असे म्हणाला. त्यावरुन त्यांनी कारमधून उतरुन जगदीश, सोनम आणि आश्विनी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यानंतर गौरव याने त्यांची अल्ट्राज कार भरधाव त्यांच्या दिशेने चालवून तुमचा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असे म्हणून त्यांच्या अंगावर गाडी घातली.
त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. सुरेखा हिने तू यांना सोडू नकोस, असे म्हणून त्याला चिथावणी दिली. त्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या स्विफ्ट कार व मोटार सायकलला ठोस देऊन त्यांचे नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करीत आहेत.