Crime News : लव्ह-मॅरेज केलं म्हणून वडिलांना आला राग, आधी लेकीला संपवले, नंतर जावयाचा घेतला जीव..


Crime News : प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, त्याने नंतर जावयाचा खून घडवून आणला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

करण रमेश चंद्र आणि गुलनाज अशी मृत पती-पत्नीचे नाव असून, गोवंडी पोलिसांनी या दुहेरी हत्याप्रकरणात मुलीचे वडील, भाऊ यांच्यासह सहा जणांची धरपकड केली आहे. यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. Crime News

मिळालेल्या माहिती नुसार, गोवंडी परिसरात १४ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. काहीतरी संशयास्पद वाटत असल्याने गोवंडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून उपायुक्त हेमराजसिंह राजपूत आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी, ट्रॉम्बे, टिळकनगर, चेंबूर व शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान हा मृतदेह उत्तर प्रदेश येथील रहिवासी करण चंद्र याचा असल्याचे निष्पन्न झाले. करणची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान करण आणि गुलनाज खान या दोघांनी प्रेमविवाह केल्याचे समजले.

या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. संशयावरून पोलिसांनी गुलनाजचे वडील गोरा रईमुद्दीन खान यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान खान यांनी मुलगा सलमान आणि चार जणांच्या मदतीने करणची हत्या केल्याची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!