Crime News : खळबळजनक! जमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी, माजी जिल्हा पंचायत सदस्यासह ६ जणांचा मृत्यू..
Crime News लखनौ : देशात सध्या गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना आली आहे. उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीमध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. (Crime News)
तर अनेकजण जखमी झाले आहेत. ही भयावह घटना देवरियामधील रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, तिथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, देवरियामधील रुद्रपूर कोतवाली परिसरातील फतेहपूर च्या लेहडा टोला येथे सोमवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेम यादव यांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.
या घटनेचा बदला घेण्यासाठी जमलेल्या जमावाने आरोपी पक्षामधील सत्यप्रकाश दुबे याच्या घरावर हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर संतप्त जमावाने दोन मुले, एक महिला आणि अन्य एकाची हत्या केली.
जमावाने घरात घुसून पत्नी किरण, मुलगी शालोनी (वय. १८), नंदनी (वय. १०) आणि मुलगा गांधी (वय. १५) यांची हत्या केली. तर एक मुलगा अनमोल (वय.८) गंभीर जखमी झाला.
दरम्यान, ही घटना रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावामध्ये घडली. जमिनीच्या वादातून ही हाणामारी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. संतप्त जमावाने घटनास्थळावर उभी असलेली कार आणि बुलेट पेटवून दिली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.