Crime News : फिर्याद देणारा पतीच ठरला पत्नीच्या खूनाचा आरोपी! रांजणगाव सांडस खूनाचा अखेर पोलिसांनी केला उलगडा ..!!
Crime News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या वादाला कंटाळून पतीनेच पत्नीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच खुनी निघाला आहे. या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पोलिस पथकाला यश आले आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
शीतल स्वप्नील रणपिसे (वय. २१) या विवाहितेचा बुधवारी (ता.३) खून करण्यात आला होता. याबाबत शीतलचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे (वय.२६) याने, आम्ही कुणी घरात नसताना अज्ञात व्यक्तीने शीतलचा खून केला, अशी फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शिरूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेशनने तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळाला भेट दिली.
दरम्यान, विवाहितेचे घर, परिसराची पाहणी केल्यानंतर आसपास चौकशी केली. यातून पोलिसांचा संशय बळावल्याने मृत विवाहितेचा पती स्वप्नीलला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. Crime News
किरकोळ कारणावरून आमच्यात वाद होत होते. पत्नी कायमच माझ्यावर आणि मी देखील तिच्यावर शंका घेत असायचो. ती नेहमी माझी इतरांशी तुलना करायची, ते मला अजिबात आवडत नव्हते. दरम्यान, बुधवारी दुपारी शीतल घरी एकटी असताना स्वयंपाकगृहात दोघांत वाद झाले.
त्यानंतर त्याने नायलॉनच्या दोरीने शीतलचा गळा आवळल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतरही त्याने इलेक्ट्रीक वायर तीच्या अंगठ्याला गुंडाळून शॉक दिला. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्वप्नील याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.