Crime News : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरात चोरी, घरातील कामवालीनेच चोरला लाखोंचा ऐवज..


Crime News मुंबई : मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात मोठी चोरी झाली आहे. त्याच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेने १० लाखो रुपयांहून अधिक किमतीचे दागिने चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तसेच त्याच्या घरातील लाखभर रुपयाची रोख रक्कम आणि फॉरेन करन्सी देखील (परदेशी चलन) चोरीला गेली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Crime News

ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुष्कर श्रोत्री याने पोलिसांत धाव घेत उषा घांगुर्डे आणि भानुदास घांगुर्डे या दोघांविरोधात फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी नुसार, पुष्कर हा विलेपार्ले येथे राहतो. घरातील सर्व कामकाज करण्यासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी त्याने घरात तीन मदतनीस नियुक्त केले होते.

त्यांच्यापैकी एक असलेल्या उषा घांगुर्डे (वय.४१) ही महिला गेल्या ५-६ महिन्यांपासून त्याच्याकडे सकाळी ८ ते रात्री ८ असं १२ तास काम करत होती. तिने पुष्करच्या घरातून १.२० लाख रुपयांची रोख रक्कम आणि ६०, ००० ची फॉरेन करन्सी चोरली.

तसेच २२ ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजल हिला मदतीनस उषा हिच्या वागण्यावर संशय आला. त्यानंतर श्रोत्री दांपत्याने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी उषा हिची कसून चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबूली दिली. ते पैसे चोरून आपण पती, भानुदास घांगुर्डे याच्याकडे सोपवल्याचेही उषाने सांगितले. तिचा पती भानुदासनेही चोरीचे पैसे घेतल्याचे कबूल केले.

दुसरी घटना २४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली, जेव्हा अभिनेत्याची पत्नी प्रांजल श्रोत्रीनं कपाटातून सोन्याचे दागिने काढले आणि त्यावेळी त्यांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. श्रोत्री कुटुंबियांनी सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात नेले असता ते दागिने बनावट असल्याचं लक्षात आलं.

त्यानंतर तपासादरम्यान उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याऐवजी सारखेच बनावट दागिने आणल्याचं उघड झाले. त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी २६ ऑक्टोबर रोजी उषा गांगुर्डे आणि त्यांच्या पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ३८१, ४०६ आणि ४२० अंतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!