Crime News : प्रसिद्ध मॉडेलचा फ्रीजमध्ये आढळला मृतदेह, शरीरावर जखमा, घटनेने उडाली खळबळ…


Crime News : अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेलसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये अत्यंत भयानक अवस्थेत अढळला आहे. या मॉडेलचे नाव नसून मलीसा मूनी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार मलीसा गरोदर होती. लॉस एंजेलिस या ठिकाणी राहत असून मृत्यूनंतर तिचे हात पाय घट्ट बांधून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. Crime News

मिळालेल्या माहितीनूसार मलीसा हिचा मृतदेह लॉस एंजेलिस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षक विभागाकडून शवविच्छेदनासाठी देण्यात आला होता. मृत्यूआधी मॉडेल हिच्यासोबत हिंसा झाल्याचं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शवविच्छेदन रिपोर्टनुसार, मॉडेलच्या शरीरावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला होता. तिच्या शरीरात अल्कोहोल आणि कोकेनचे अंशही सापडले होते. 12 सप्टेंबर रोजी ३१ वर्षीय मॉडेल मलीसा मूनी हिचा मृतदेह तिच्या डाउनटाउन लॉस एंजेलिस अपार्टमेंटमधील रेफ्रिजरेटरमध्ये सापडला होता.

दरम्यान, मलिसा ६ सप्टेंबर रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये शेवटची दिसली होती. पण ६ सप्टेंबरनंतर मलीसा दिसलीनसल्यामुळे तिच्या आईच्या विनंतीवरुन पोलिसांनी मॉडेलच्या अपार्टमेंटची तपासणी केली आणि फ्रिजमध्ये मलीसा हिचा मृतदेह आढळला.

या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र मॉडेलच्या मृत्यूप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. संबंधित प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!