Crime News : फुरसुंगी येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर धारदार शस्त्राने वार, लोणी काळभोर येथील एका तरूणासह चौघांना बेड्या..
Crime News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक घटना धक्कादायक घटना फुरसुंगी (ता.हवेली) येथून समोर आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांवर धारधार शास्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची उघडकीस आली आहे.
ही घटना फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खंडोबा माळ परिसरातील हर्षदीप मेडीकलच्या समोर मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी लोणी काळभोर येथील एका तरुणासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुभम गोविंद गायकवाड (वय-१९, रा. सोमाई शाळेजवळ खंडोबा माळ, फुरसुंगी, ता. हवेली), नितीन धोंडिराम मोरे (वय २२, रा. खंडोबा माळाच्या पाठीमागे, फुरसुंगी, ता. हवेली), अनिरुद्ध महादेव मोरे (वय २०) व आकाश रामहरी हाजगुडे (वय २२, रा. मोगले वस्ती, कॅनॉलच्या जवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. Crime News
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून पहिला वाद झाला होता. हा राग मनात धरून आरोपी फिर्यादी यांना धडा शिकविण्यासाठी सारखा पाठलाग करीत होते.
तसेच मंगळवारी फिर्यादी व त्यांचा मित्र खंडोबा माळ परिसरातील हर्षदीप मेडीकलच्या समोर चहा पिण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी धारदार हत्याराने डोक्यात वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हत्यारे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वरील चारही आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.