Crime News : राज्यात पुन्हा खळबळ! आता अजून एक एमडी ड्रग्स कारखाना सापडला, मोठे रॅकेट उध्वस्त…
Crime News सोलापूर : राज्यात काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरण उघड येत आहेत. सध्या असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. सोलापूरमध्येही एमडी ड्रग्सचा कारखाना नाशिक पोलिसांना मिळाला. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स मिळून आले.
सोलापूरमध्ये एमडी ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोलापूरच्या मोहोळ एमआयडीसीमधील कारखान्यावर नाशिक पोलिसांनी कारवाई केली. कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कच्चामाल पोलिसांनी जप्त केला. Crime News
सोलापुरात श्री स्वामी समर्थ केमिकल या नावाने कंपनी सुरू होती. ही कंपनी बंद पडली. त्यानंतर मनोहर काळे याने ही कंपनी चालवण्यास घेतली. सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसीमध्ये असलेल्या या कारखान्यात ड्रग्सचे उत्पादन सुरु झाले.
नाशिक पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. ललित पाटील प्रकरणाचा संबंध सोलापुरातील ड्रग्स कारखान्यासोबत आहे का? याची देखील नाशिक पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.
नाशिक पोलिसांच्या तीन पथकांनी सोलापूरमध्ये जाऊन कारवाई केली. कारखान्यात एमडी ड्रग्स आणि ड्रग्ससाठी लागणारा कच्चामाल पोलिसांनी जप्त केला. या ठिकाणी १० कोटींचे ड्रग्स मिळाले आहे. तसेच आठ जणांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहेत.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी १२.५ ग्राम एमडी सापडले होते. त्या प्रकरणाचा तपास करत असताना काही आरोपींना अटक केली होती. सनी पगारे, अर्जुन पिवल, मनोज गांगुर्डे, सुमित पगारे यांना अटक झाली. त्यांच्याकडून पाच किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते.