Crime News : सासऱ्याचा जावयावर अॅसिड हल्ला! हनिमूनवरून झाला वाद, कल्याणमध्ये भयंकर घटना….

Crime News : सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कल्याणमधून समोर आली आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हनिमुनला जाण्यावरुन सासरा आणि जावई यांच्यात वाद झाल्याने त्या वादातून हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस सासऱ्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
ईबाद फालके असं जावयाचं नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जावई आणि मुलीने प्राथनेसाठी मक्का मदिनेला जावे, अशी सासरा जकी खोटालची मागणी होती. मात्र, जावयाने आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सासऱ्यांना सांगितले. यावरुन त्यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता. Crime News
दरम्यान, जावई आणि मुलगी हनिमुनला कुठे जाणार दोघांमध्ये वाद असतानाच सासऱ्याने पीडितेवर ॲसिड हल्ला केला. हनिमूनला कुठे जायचे? यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात आहे आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.