Crime News : बहिणीच्या ‘लव्ह मॅरेज’ला मदत केली म्हणून राग, डोक्यावर चार वेळा बोलेरो घालून तरुणाची हत्या, घटनेने संभाजीनगर हादरलं…
Crime News : राज्यात दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. बहिणीच्या लव्ह मॅरेजल मदत केली म्हणून भावाने २४ वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घातल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे.
पवन शिवराम लोढे (वय.२४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली. विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली.
संभाजीनगरच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली होती. एखाद्या सिनेमाच्या कथानकलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार असल्याचे या परिसात म्हटले जात आहे.
दरम्यान, आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती.
याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार दिली. यामध्ये पवन गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेने संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते. घरात लग्नाची तयारी केली जात होती. ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते, त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याने मृत तरुणाचे कुटंबीय टाहो फोडत आहेत.