Crime News : अहमदनगर हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल, घटनेने उडाली खळबळ..
Crime News : राज्यात अलीकडे महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेने महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. एका ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगर जिल्हयात ही धक्कदायक घटना घडली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचर करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडितेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिनाभर अत्याचार केला. मुलीच्या नातेवाईकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना समोर आली आहे. Crime News
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर पोलिसांकडून पोक्सो ॲट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपींना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेने अहमदनगर हादरून गेले आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.