Crime News : गावठी पिस्टल काडतुसासह अट्टल गुन्हेगाराला वरवंड येथे अटक, यवत आणि पाटस पोलिसांची कारवाई…
Crime News : दौंड तालुक्यातील पाटस पोलीस चौकीच्या हद्दीतील वरवंड येथे एका अट्टल गुन्हेगाराला एक गावठी पिस्टल व काडतुसासह अटक करण्यात आली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली.
अमोल राजेंद्र नातू (रा.पिंपळगाव ता.दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, हिरालाल खोमणे हे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनाने गस्त घालत असताना, यांना याबबत बातमी मिळाली होती की अमोल नातु याच्याकडे गावठी पिस्टल असून, तो वरवंड येथील हॉटेल पाटील चावडी येथे आहे.
अशी बातमी मिळाली आणि त्यानुसार यवत व पाटस पोलिस पथकाने हॉटेल चावडी या ठिकाणी संशयित आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक काडतुस आढळून आले आहे. Crime News
आरोपी अमोल नातु याच्यावर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, हिरालाल खोमणे आदींच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.