Crime News : ऑनलाइन गँगरेप!! गेम खेळणाऱ्या १६ वर्षांच्या तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार, देशात खळबळ..

Crime News : ब्रिटनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सायबर गुन्हेगारीमधील एक फारच विचित्र प्रकार घडला आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मेटाव्हर्समध्ये गेम खेळत असलेल्या एका १६ वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
‘ १६ वर्षीय मुलगी व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरलं. व्हर्चुअल जगात ही सर्व मुलं या मुलीच्या व्हर्चुअल अवताराशी छेडछाड करु लागले आणि त्यांनी तिचा ‘गँगरेप’ केला,’ असं ‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. Crime News

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. तसेच कोणतेही शारीरिक नुकसान तिला झालेलं नाही. मात्र या मुलीच्या मानसिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. तिचं आता समोपदेशन केलं जात आहे.
खऱ्या आयुष्यात बलात्कार पीडितेला जो मानसिक त्रास होतो तसाच त्रास या मुलीला झाला आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचं ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटलंय. त्यामुळेच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी ‘होरायझन वर्ल्ड्स’ नावाचा गेम खेळत होती. हा मेटाचा एक प्रोडक्ट आहे. मेटा ही फेसबुकची मातृक कंपनी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या प्लॅटफॉर्मवर व्हर्चुअल लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
मात्र युनायटेड किंग्डममध्ये या असल्या प्रकरणांमध्ये कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. आता हे असं प्रकरण समोर आल्यानंतर व्हर्चुअल जगातील या असा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी वेळ घालवायला हवा का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खऱ्या जगात आधीपासूनच पोलिसांकडे बलात्काराची एवढी प्रकरणे असताना या गोष्टींना प्राधान्य द्यावे की व्हर्चुअल जागातील गुन्ह्यांना हे निश्चित करावे लागेल असे लोकांच म्हणणे आहे.