Crime News : अल्पवयीन मुलीवर १७ वर्षाच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार, पर्वती येथील धक्कादायक घटना…
Crime News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याबरोबर १७ वर्षाच्या युवकाने शारीरीक संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकणी मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी १७ जुलै २०२४ रोजी घडला होता. Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे जवळजवळ राहतात. त्याच्या घरात कोणी नसताना १७ वर्षाच्या युवकाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावले. तिला मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, असे सांगून तिच्याशी दोन वेळा शारीरीक संबंध ठेवले आहेत.
दरम्यान, याची माहिती मुलीच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तपास करीत आहेत.