Crime News : अनैतिक संबंधात पती ठरत होता अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन्…


Crime News : गुन्हेगारीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. अनेक धक्कादायक घटना रोज समोर येत आहे. सध्या अशीच एकद धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय पत्नीने २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीची राहत्या घरातच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करीत पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पतीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनुभव रामप्रकाश पांडे (वय.२३) असे अटक केलेल्या पत्नीच्या प्रियकराचे नाव आहे. तर बलराम उर्फ शेखर लक्ष्मण मिश्रा (वय. २७) असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.

ही घटना भिवंडीतील कशेळी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत घडली आहे. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी शिताफीने तपास करून हत्येचा उलगडा करून आरोपी प्रियकराला उत्तरप्रदेश मधील लखनऊमध्ये सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. तर हत्येच्या कटात सामील पत्नीलाही लखनऊमधून ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बलराम उर्फ शेखर आणि त्याची पत्नी मूळची उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील कुहिडदिया गावाचे रहिवासी आहेत. लग्नानंतर दोघेही भिवंडी तालुक्यातील कशेळी रेतीबंदर रोडवरील दुर्गेश पार्क जवळील ओम साई अपार्टमेंटमध्ये राहत होते. Crime News

त्यातच आरोपी अनुभव पांडे हाही याच ओम साई अपार्टमेंटच्या एका सदनिकेत भाडेकरू म्हणून राहत होता. तसेच मृतक आणि आरोपी दोघेही उत्तरप्रदेशमधील रहिवासी असल्याने ओळख होऊन त्यांची मैत्री झाली होती. त्यामुळे दोघांचे घरी येणे जाणे होत असल्याने मृतकची पत्नी आणि आरोपी अनुभवमध्ये प्रेमाचं सूत जुळून अनैतिक संबध प्रस्थापित झाले.

दुसरीकडे मृतक पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपी अनुभवने मृतकची पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पती बलरामची त्याच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून कशेळी भागात असलेल्या खाडी पात्रात फेकून दिला.

दुसऱ्या दिवशी मृतक बलराम दिसत नसल्याचे पाहून त्याच्या एका नातेवाईकाने नारपोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे आणि नातेवाईकाने दिलेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने तपास सुरू केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!