Crime News : कोरेगाव भिमातील व्यावसायिकाची आत्महत्या प्रकरणी ११ सावकारांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?


Crime News : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यावसायिकाने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याप्रकणी महेश सुररा कुलकर्णी (वय.४४ रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 11 जणांवर गुन्हे दाखल केले याहेत.

नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर) सुधाकर कांतीलाल ढेरंगे, कांतीलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर) शांताराम सावंत (रा. वाडागाव ता. शिरुर) अजय यादव, जनार्धन वाळूज (रा. लोणीकंद ता. हवेली) जातेगाव खुर्दचे माजी सरपंच किशोर खळदकर (रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर), मामा सातव (रा. वाघोली ता. हवेली) या अकरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

कोरेगाव भीमा येथे गेली सुरेश कुलकर्णी हे कित्येक वर्षे किराणा व्यावसायिक म्हणून किरण आपले दोन भाऊ, आई-वडील यांच्यासमवेत ‘वैष्णवी सुपर मार्केट’ या नावाने दुकान चालवीत होते. कोरोना काळात हा व्यवसाय अडचणीत आल्याने कुलकर्णी यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. एकाचे व्याज देण्यासाठी दुसऱ्याकडून कर्ज घ्यायला त्यांना लागल्याने त्यांच्या सावकारांची संख्याच तब्बल ११ झाली होती.

गेल्या काही दिवसांत हे सर्व खासगी सावकार किरण यांना प्रचंड मानसिक त्रास देत होते. पुढील काळात त्यांनी सुधाकर ढेरंगे व कांतिलाल ढेरंगे यांच्यासोबत कोरेगाव येथे भागीदारीत एक इमारत बांधलेली होती. अशातच या सर्व सावकारांच्या तगाद्यामुळे ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळे विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

मात्र, या सदनिका व गाळ्यांना ग्राहक आले की, ढेरंगे हे त्या ग्राहकांना इमारत वा गाळे घेऊ देत नव्हते. अशा परिस्थितीत चोहोबाजूनी आर्थिक व मानसिक कोंडीचा त्रास सहन न झाल्याने त्यांनी अखेर गुरुवारी (ता. ११) न्हावी सांडस (ता. शिरूर) येथील भीमा नदीत उडी मारून आत्महत्या केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!