Crime News : देऊळगाव गाड्याच्या सरपंचासह चार जणांवर जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल, दिव्यांगाचा अपमान अन् शिवीगाळ प्रकरणी कारवाई…


Crime News : दौंड येथील देऊळगाव गाडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच विजया बारवकर व त्यांचे पती सोमनाथ बारवकर यांच्यासह चार जणांवर गावातील एका दिव्यांग व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ करणे, व्हाट्सअपवर त्यांच्या अपंगत्वावर अपमान करत शब्द वापरले प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशी  माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी माहिती दिली आहे. विजया सोमनाथ बारवकर, सोमनाथ शिवाजी बारवकर, जालींदर सखाराम बारवकर, ज्ञानेश्वर आबा वाघापुरे (सर्व रा. देउळगावगाडा ता. दौड जि. पुणे. ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावातील नवनाथ साहेबराव मोरे (वय. ४७ ) या दिव्यांग व्यक्तीला सरपंच विजया सोमनाथ बारवकर तसेच त्यांचे पती सोमनाथ शिवाजी बारवकर यांनी घरासमोर जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच सोमनाथ बारवकर यांनी ग्रामपंचायत देउळगांवगाडा या व्हॉटसअप ग्रुपवरती अपंगत्वावर अपमानकारक शब्द वापरुन अपमान केला. त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात आल्यास, मासिक मिटिंगमध्ये बसण्यासाठी खुर्ची न देणे , अपमानकारक वागवून देणे तसेच निधीबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तर देत तुला उत्तर देण्याची तुझी तेवढी लायकी नाही, असे म्हटले.

आमची तक्रार केली, तर तुझ्या विरोधात आम्हीही तक्रार देऊ अशी धमकी दिली. याबाबत फिर्याद पिडीत नवनाथ मोरे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली.

या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी अपंग व्यक्ती अधिनियम कायदा आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपींना अद्याप अटक केली नाही. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप हे अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!